Shri Gajanan Maharaj Bavanni | श्री गजानन महाराज बावन्नी
Shri Gajanan Maharaj Bavanni is a sacred Marathi devotional composition dedicated to Shri Gajanan Maharaj of Shegaon.
Devotees recite this Bavanni to seek courage, faith, and divine blessings during difficult times.
Below you can read the complete Shri Gajanan Maharaj Bavanni along with its spiritual significance.
Devotees recite this Bavanni to seek courage, faith, and divine blessings during difficult times.
Below you can read the complete Shri Gajanan Maharaj Bavanni along with its spiritual significance.
प्रस्तावना
श्री गजानन महाराज बावन्नी ही संत श्री गजानन महाराजांच्या महिम्याचे वर्णन करणारी अत्यंत भक्तिपूर्ण रचना आहे.
या बावन्नीचे श्रद्धेने पठण केल्यास मनःशांती, संकटांपासून मुक्ती आणि गुरुकृपा प्राप्त होते.
श्री गजानन महाराज बावन्नी
जय जय सदगुरू गजानना |
रक्षक तूची भक्तजना ||१||
निर्गुण तू परमात्मा तू |
सगुण रुपात गजानन तू ||२||
सदेह तू, परी विदेह तू |
देह असून देहातीत तू ||३||
माघ वद्य सप्तमी दिनी |
शेगावात प्रगटोनी ||४||
उष्ट्या पत्रावळीनिमित्त |
विदेह्त्व तव हो प्रगट ||५||
बंकट लालावरी तुझी |
कृपा जाहली ती साची ||६||
गोसाव्याच्या नवसासाठी |
गांजा घेसी लावून ओठी ||७||
तव पद तीर्थे वाचविला |
जानराव तो भक्त भला ||८||
जानाकीरामा चिंचवणे |
नासवोनी स्वरूपी आणणे ||९||
मुकीन चंदूचे कानवले |
खाउन कृतार्थ त्या केले ||१०||
विहिरी माजी जलवाहीना |
केले देवा जल भरणा ||११||
मध माश्यांचे डंख तुवा |
सहन सुखे केले देवा ||१२||
त्यांचे काटे योगबले |
काढुनी सहजी दाखविले ||१३||
कुस्ती हरीशी खेळोनि |
शक्ती दर्शन घडवोनी ||१४||
वेद म्हणुनी दाखविला |
चकित द्रविड ब्राह्मण झाला ||१५||
जळत्या पर्यकावरती |
ब्रह्म्हगीरीला ये प्रचीती ||१६||
टाकळीकर हरिदासाचा |
अश्व शांत केला साचा ||१७||
बाळकृष्ण बाळापुराचा |
समर्थ भक्तची जो होता ||१८||
रामदास रूपे त्याला |
दर्शन देवोनी तोषविला ||१९||
सुकलालची गोमाता |
&nb द्वाड बहु होती ताता ||२०||
कृपा तुझी होताच क्षणी |
शांत जाहली ती जननी ||२१||
घुडे लक्ष्मण शेगावी |
येता व्याधी तू निरवी ||२२||
दांभिकता परी ती त्याची |
तू न चालवोनी घे साची ||२३||
भास्कर पाटील तव भक्त |
उद्धरलासी तू त्वरित ||२४||
आज्ञा तव शिरसावंद्य |
काकही मानती तुज वंद्य ||२५||
विहिरीमाजी रक्षियला |
देवा तू गणू जवऱ्याला ||२६||
पिताम्बराकरवी लीला |
वठला आंबा पल्लवीला ||२७||
सुबुद्धी देशी जोश्याला |
माफ करी तो दंडाला ||२८||
सवडद येथील गंगाभारती |
थुंकूनी वारिली रक्तपिती ||२९||
पुंडलिकाचे गंडांतर |
निष्ठा जाणून केले दूर ||३०||
ओंकारेश्वरी फुटली नौका |
तारी नर्मदा क्षणात एका ||३१||
माधवनाथा समवेत |
केले भोजन अदृष्ट ||३२||
लोकमान्य त्या टिळकांना |
प्रसाद तूची पाठविला ||३३||
कवर सुताची कांदा भाकर |
भक्शिलीस तू प्रेमाखातर ||३४||
नग्न बैसोनी गाडीत |
लीला दाविली विपरीत ||३५||
बायजे चित्ती तव भक्ती |
पुंडलीकावरी विरक्त प्रीती ||३६||
बापुना मनी विठ्ठल भक्ती |
स्वयं होशी तू विठ्ठल मूर्ती ||३७||
कवठ्याच्या त्या वारकऱ्याला |
मरीपासुनी वाचविला ||३८||
वासुदेव यती तुज भेटे |
प्रेमाची ती खुण पटे ||३९||
उद्धट झाला हवालदार |
भस्मीभूत झाले घरदार ||४०||
देहान्ताच्या नंतरही |
कितीजणा अनुभव येई ||४१||
पडत्या मजूरा झेलीयेले |
बघती जन आश्चर्य भले ||४२||
अंगावरती खांब पडे |
स्त्री वांचे आश्चर्य घडे ||४३||
गजाननाच्या अद्भुत लीला |
अनुभव येती आज मितीला ||४४||
शरण जाऊनी गजानना |
दुःख तयाते करी कथना ||४५||
कृपा करी तो भक्तांसी |
धावून येतो वेगेसी ||४६||
गजाननाची बावन्नी |
नित्य असावी ध्यानी मनी ||४७||
बावन्न गुरुवारी नेमे |
करा पाठ बहु भक्तीने ||४८||
विघ्ने सारी पळती दूर |
सर्व सुखांचा येई पूर ||४९||
चिंता साऱ्या दूर करी |
संकटातूनी पार करी ||५०||
सदाचार रत सद्भक्ता |
फळ लाभे बघता बघता ||५१||
भक्त बोले जय बोला |
गजाननाची जय बोला ||
जय बोला हो जय बोला |
गजाननाची जय बोला ||५२||
रक्षक तूची भक्तजना ||१||
निर्गुण तू परमात्मा तू |
सगुण रुपात गजानन तू ||२||
सदेह तू, परी विदेह तू |
देह असून देहातीत तू ||३||
माघ वद्य सप्तमी दिनी |
शेगावात प्रगटोनी ||४||
उष्ट्या पत्रावळीनिमित्त |
विदेह्त्व तव हो प्रगट ||५||
बंकट लालावरी तुझी |
कृपा जाहली ती साची ||६||
गोसाव्याच्या नवसासाठी |
गांजा घेसी लावून ओठी ||७||
तव पद तीर्थे वाचविला |
जानराव तो भक्त भला ||८||
जानाकीरामा चिंचवणे |
नासवोनी स्वरूपी आणणे ||९||
मुकीन चंदूचे कानवले |
खाउन कृतार्थ त्या केले ||१०||
विहिरी माजी जलवाहीना |
केले देवा जल भरणा ||११||
मध माश्यांचे डंख तुवा |
सहन सुखे केले देवा ||१२||
त्यांचे काटे योगबले |
काढुनी सहजी दाखविले ||१३||
कुस्ती हरीशी खेळोनि |
शक्ती दर्शन घडवोनी ||१४||
वेद म्हणुनी दाखविला |
चकित द्रविड ब्राह्मण झाला ||१५||
जळत्या पर्यकावरती |
ब्रह्म्हगीरीला ये प्रचीती ||१६||
टाकळीकर हरिदासाचा |
अश्व शांत केला साचा ||१७||
बाळकृष्ण बाळापुराचा |
समर्थ भक्तची जो होता ||१८||
रामदास रूपे त्याला |
दर्शन देवोनी तोषविला ||१९||
सुकलालची गोमाता |
&nb द्वाड बहु होती ताता ||२०||
कृपा तुझी होताच क्षणी |
शांत जाहली ती जननी ||२१||
घुडे लक्ष्मण शेगावी |
येता व्याधी तू निरवी ||२२||
दांभिकता परी ती त्याची |
तू न चालवोनी घे साची ||२३||
भास्कर पाटील तव भक्त |
उद्धरलासी तू त्वरित ||२४||
आज्ञा तव शिरसावंद्य |
काकही मानती तुज वंद्य ||२५||
विहिरीमाजी रक्षियला |
देवा तू गणू जवऱ्याला ||२६||
पिताम्बराकरवी लीला |
वठला आंबा पल्लवीला ||२७||
सुबुद्धी देशी जोश्याला |
माफ करी तो दंडाला ||२८||
सवडद येथील गंगाभारती |
थुंकूनी वारिली रक्तपिती ||२९||
पुंडलिकाचे गंडांतर |
निष्ठा जाणून केले दूर ||३०||
ओंकारेश्वरी फुटली नौका |
तारी नर्मदा क्षणात एका ||३१||
माधवनाथा समवेत |
केले भोजन अदृष्ट ||३२||
लोकमान्य त्या टिळकांना |
प्रसाद तूची पाठविला ||३३||
कवर सुताची कांदा भाकर |
भक्शिलीस तू प्रेमाखातर ||३४||
नग्न बैसोनी गाडीत |
लीला दाविली विपरीत ||३५||
बायजे चित्ती तव भक्ती |
पुंडलीकावरी विरक्त प्रीती ||३६||
बापुना मनी विठ्ठल भक्ती |
स्वयं होशी तू विठ्ठल मूर्ती ||३७||
कवठ्याच्या त्या वारकऱ्याला |
मरीपासुनी वाचविला ||३८||
वासुदेव यती तुज भेटे |
प्रेमाची ती खुण पटे ||३९||
उद्धट झाला हवालदार |
भस्मीभूत झाले घरदार ||४०||
देहान्ताच्या नंतरही |
कितीजणा अनुभव येई ||४१||
पडत्या मजूरा झेलीयेले |
बघती जन आश्चर्य भले ||४२||
अंगावरती खांब पडे |
स्त्री वांचे आश्चर्य घडे ||४३||
गजाननाच्या अद्भुत लीला |
अनुभव येती आज मितीला ||४४||
शरण जाऊनी गजानना |
दुःख तयाते करी कथना ||४५||
कृपा करी तो भक्तांसी |
धावून येतो वेगेसी ||४६||
गजाननाची बावन्नी |
नित्य असावी ध्यानी मनी ||४७||
बावन्न गुरुवारी नेमे |
करा पाठ बहु भक्तीने ||४८||
विघ्ने सारी पळती दूर |
सर्व सुखांचा येई पूर ||४९||
चिंता साऱ्या दूर करी |
संकटातूनी पार करी ||५०||
सदाचार रत सद्भक्ता |
फळ लाभे बघता बघता ||५१||
भक्त बोले जय बोला |
गजाननाची जय बोला ||
जय बोला हो जय बोला |
गजाननाची जय बोला ||५२||
|| अनंत कोटी ब्रम्हांड नायक, महाराजाधिराज योगिराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतीपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय ||
Meaning and Significance
English
Shri Gajanan Maharaj Bavanni praises the divine qualities, miracles, and spiritual power of Shri Gajanan Maharaj.
It strengthens faith and reminds devotees to surrender ego and trust divine grace.
It strengthens faith and reminds devotees to surrender ego and trust divine grace.
मराठीत अर्थ व महत्त्व
ही बावन्नी श्री गजानन महाराजांच्या दिव्य गुणांचे आणि कृपेचे स्तवन करते.
भक्तांनी श्रद्धा, नम्रता आणि समर्पण ठेवावे हा संदेश यात दिला आहे.
भक्तांनी श्रद्धा, नम्रता आणि समर्पण ठेवावे हा संदेश यात दिला आहे.
हिंदीमे अर्थ और महत्व
यह बावन्नी श्री गजानन महाराज के दिव्य गुणों और कृपा का वर्णन करती है।
यह भक्तों को श्रद्धा और समर्पण की प्रेरणा देती है।
यह भक्तों को श्रद्धा और समर्पण की प्रेरणा देती है।
Benefits of Reciting Shri Gajanan Maharaj Bavanni
English
Regular recitation brings courage, peace, and spiritual confidence.
Devotees feel protected and guided through divine grace.
Devotees feel protected and guided through divine grace.
मराठीत
बावन्नीचे नियमित पठण केल्याने धैर्य, शांती आणि आत्मविश्वास वाढतो.
हिंदीमे
नियमित पाठ से साहस और आत्मबल बढ़ता है।
When to Recite Shri Gajanan Maharaj Bavanni
English
This Bavanni can be recited daily, especially on Thursdays
and during special occasions related to Shri Gajanan Maharaj.
and during special occasions related to Shri Gajanan Maharaj.
कधी पठण करावे
ही बावन्नी दररोज किंवा विशेषतः गुरुवारी आणि महाराजांच्या पुण्यतिथीला पठण करावी.
कब पाठ करें
इस बावन्नी का पाठ प्रतिदिन या विशेष रूप से गुरुवार के दिन करना शुभ माना जाता है।

Pingback: Shri Saptashrungi Mata Mantra | Powerful Devi Mantras
Pingback: Shri Swami Samarth Tarak Mantra | श्री स्वामी समर्थ तारक मंत्र - Shri Ram Kaaj